सरकारनामा ब्यूरो
राज्यसकराने पुन्हा एकदा 9 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यात राजेश देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे.
कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी करण्यात आली आहे.
राजेश देशमुख हे 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
एमपीएससी परीक्षेत देशमुख यांनी संपूर्ण राज्यातून दुसऱ्या क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
बीडचे आमदार धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे.
देशमुख यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे. यावेळी त्यांनी 62 हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करणे आणि माण, खटाव हे तालुके दुष्काळमुक्ती व रोजगारनिर्मितीसाठी यशस्वीरित्या प्रयत्न केले.
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्ह्यधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी येथे त्यांच्या धडाकेबाज कामगिरीने लोकांमध्ये वेगळीच छाप निर्माण केली.
यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांचा कापूस फवारणीदरम्यान मृत्यु झाला होता. यावेळी त्यांनी फवारणीबाबत शेतकऱ्यासाठी जनजागृतीचे अभियान सुरु केले. तसेच गाळमुक्त धरण, राष्ट्रीय महामार्गाचे काम, सर्वासाठी घरे असा योजना राबविल्या.