Jagdish Patil
ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
PM मोदींच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली.
कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. देशाच्या 26 व्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड झालेले ज्ञानेश कुमार यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया.
1988 च्या बॅचचे केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी उत्तर प्रदेशच्या आगरा येथे झाला.
वाराणसी आणि लखनऊमध्ये त्यांनी महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं.
जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर तेथील परिस्थिती हाताळण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तर राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते.