K Suresh News : ओम बिर्लांविरुद्ध INDIA आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार के. सुरेश कोण?

Akshay Sabale

अर्ज दाखल -

इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षासाठी निवडणूक होत आहे. 'एनडीए'कडून ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. तर 'इंडिया' आघाडीकडून के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे.

K Suresh | sarkarnama

दलित चेहरा -

के. सुरेश हे काँग्रेसचे खासदार असून 8 वेळा संसदेवर निवडून आले आहेत. के. सुरेश हे काँग्रेसमधील एक दलित चेहरा आहेत.

K Suresh | sarkarnama

मावेलिक्कारा मतदारसंघ -

के. सुरेश मावेलिक्कारा मतदारसंघातून चारवेळा निवडणूक जिंकली आहे. मावेलिक्कारामधून ते पहिल्यांदा 2009 मध्ये निवडून आले होते.

K Suresh | sarkarnama

अदूर मतदारसंघ -

यापूर्वी के. सुरेश यांनी चारवेळा अदूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. दोन वेळा म्हणजे 1998 आणि 2004 मध्ये के. सुरेश यांचा पराभव झाला होता.

K Suresh | sarkarnama

राज्यमंत्री -

2009 साली मनमोहन सिंह सरकारमध्ये के. सुरेश यांना कामगार आणि रोजगर मंत्रालयाचं राज्यमंत्री केलं होतं. 2018 मध्ये त्यांना केरळ काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं.

K Suresh | sarkarnama

अरूण कुमार यांचा पराभव -

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत के. सुरेश यांनी 'सीपीआय'चे तरूण उमेदवार अरूण कुमार यांचा 10868 मतांनी पराभव केला.

K Suresh | sarkarnama

संपत्ती -

के. सुरेश यांनी लोकसभा निवडणुकीत आपली संपत्ती 1.5 कोटी असल्याचं घोषित केलं होतं.

K Suresh | sarkarnama

NEXT : भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास कसा?

Suryakanta Patil | Sarkarnama