Gopikishan Bajoria : उद्धव ठाकरेंना आव्हान देणारे माजी आमदार गोपिकिशन बजोरिया कोण?

Jagdish Patil

उद्धव ठाकरे

शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन आणि विप्लव बजोरिया यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Uddhav Thackeray, Gopikishan Bajoria | Sarkarnama

भेटीचं वृत्त फेटाळलं

आपण उध्दव ठाकरेंना भेटल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचं सांगत, बजोरिया यांनी भेटीबाबतचे वृत्त फेटाळलं.

Uddhav Thackeray | Sarkarnama

एकनाथ शिंदेंची भेट

विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून परतत असताना, उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे दिसले. त्या दोघांना नमस्कार सुद्धा केला नाही, भेटणं तर खूप दूरची गोष्ट आहे, असं स्पष्टीकरणं त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde | Sarkarnama

चांगले संबंध

शिवसेनेत फूट पडण्याआधी गोपीकिशन बजोरिया यांचे उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध होते.

Gopikishan Bajoria, Uddhav Thackeray | Sarkarnama

फूटीनंतर शिंदेंसोबत

मात्र शिवसेनेतील फूटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण पसंत केलं. 2004, 2010 आणि 2016 असं सलग तीन वेळा ते महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले आहेत.

Eknath Shinde | Sarkarnama

ठाकरेंना आव्हान

ठाकरे गटाची विश्वासाहर्ता संपली आहे. खोट्या बातम्या देऊन खोटी प्रसिध्दी करण्याऐवजी ठाकरेंनी स्वतः पुढे येऊन मी त्यांना भेटलो होतो सांगावं', असं आव्हान बजोरिया यांनी ठाकरेंना दिलं आहे.

Gopikishan Bajoria | Sarkarnama

शिवसेनेत बंड

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यावेळी विधानपरिषदेतून त्यांना सर्वप्रथम विप्लव बजोरिया यांनी पाठिंबा दिला होता. ते गोपिकिशन यांचे पुत्र आहेत.

Gopikishan Bajoria, Viplav Bajoria | Sarkarnama

विधानपरिषदेतून निवृत्त

विप्लव बजोरिया हे नुकतेच विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत.

Viplav Bajoria | Sarkarnama

NEXT : महिलांसाठी विविध योजना

Ajit Pawar | Sarkarnama