Ganesh Sonawane
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवल्याने, आता त्यांच्या आंदोलनात त्यांची पत्नी गीतांजली जे आंगमो प्रमुख चेहरा म्हणून पुढे आल्या आहेत.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे गीतांजली चर्चेत असल्या तरी, त्यांनी स्वतःची एक प्रभावी कारकीर्द घडवली आहे.
गीतांजली आंगमो या एक सामाजिक उद्योजिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक व्यवसाय आणि सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत.
त्या लडाख येथील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज (HIAL) च्या सह-संस्थापिका, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि डीन आहेत.
HIAL ही सोनम वांगचुक आणि गीतांजली जे आंगमो यांनी २०१७ मध्ये स्थापन केलेली एक शैक्षणिक, पर्यावरणीय संस्था आहे.
गीतांजली ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन असून त्यांच्या नावावर एक जागतिक विजेतेपदही आहे. याशिवाय त्या नृत्यांगनाही आहेत.
गीतांजली यांचा जन्म ओडिशातील बालासोर येथे झाला. गीतांजलीने फकीर मोहन विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.
गीतांजली यांनी भुवनेश्वर येथील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (XIMB) मधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए देखील केले आहे.
उद्योजकता आणि शिक्षण क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातही काम केले आहे. त्यांना वेद, उपनिषदे आणि हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची प्रचंड आवड आहे.