Roshan More
हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस काँग्रेसकडून सुरुवात केली. ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते.
2014 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.
राहुल गांधींनी पक्षाची बांधणी करताना महाराष्ट्रातून राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांना आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले होते. तेव्हा पासून ते राहुल गांधींच्या गुड बूकमध्ये होते.
काँग्रेस पक्षसंघटनेचे काम हर्षवर्धन जाधव यांनी राष्ट्रीयस्तरावर केले. काँग्रेसचे सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
2017 मध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच पक्षाची कामगिरी चांगलीच सुधारली. या निवडणुकीत सहप्रभारी म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जबाबदारी होती.
काँग्रेस पक्षाच्या पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी काम पाहिले आहे.