Roshan More
उत्तर प्रदेशमधील IAS दिव्या मित्तल यांनी राजीनामा दिला आहे.
ट्विटर आणि फेसबूक पोस्ट करत त्यांनी आपण राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.
दिव्या या मागील 13 वर्षांपासून सेवेत होत्या. 2013 च्या बॅचच्या अधिकारी होत्या.
त्यांनी IIT दिल्ली और IIM बैंगलोर येथून शिक्षण घेतले आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरील लागली होती. तेथे नोकरी करत असताना पुन्हा देशात परतण्याचा निर्णय घेतला.
लंडनमध्ये नोकरी लागल्यानंतर देखील सर्व मिळूनही अपूर्ण असल्याची भावना असल्याने आपण देशसेवेसाठी UPSC ची तयारी केल्याचे त्यांनी म्हटले होते.
मित्तल यांनी जिल्हाधिकारी ते महसूल विभागातील विशेष सचिव म्हणून मागील 13 वर्षात विविध पदे जबाबदाऱ्या संबाळल्या. विशेष सचिवपदी असतानाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.
दिव्या यांनी आपल्या राजीनामापत्रात राजीनामा का दिला आहे?याचे कारण दिले नाही. तसेच सरकारने हा राजीनामा स्वीकारला आहे की नाही हे देखील स्पष्ट झाले नाही.