काकडी लागवडीसाठी अनुदान लाटल्याचा आरोप; धर्मेंद्र प्रधानांच्या विभागात आलेले IAS अधिकारी कोण?

Rajanand More

शिक्षण सचिवांची बदली

नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन होत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्च शिक्षण सचिव विनित जोशी यांना हटवत नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती केली आहे.

dharmendra pradhan | sarkarnama

कोण आहेत गंगवार?

गंगवार हे १९९४ च्या तुकडीचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले असून सध्या ते केंद्र सरकारच्या सेवेत आहेत.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

भ्रष्टाचाराचे आरोप

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात कार्यरत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी संरक्षित शेती योजनेअंतर्गत अनुदान घेतल्याचा आरोप आहे. गंगवार यांनी त्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

काकडी लागवड

'द इंडियन एक्सप्रेस'च्या जून २०२६ च्या रिपोर्टनुसार, गंगवार यांच्या आई, पत्नी आणि मुलाला संरक्षित शेती योजनेचा लाभ मिळाला होता. काकडी लागवडीसाठी सुमारे १.१६ कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याचा आरोप आहे.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

सेवा नियमांचे उल्लंघन?

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्याबद्दल सरकारवरही आरोप झाले होते. त्यामुळे गंगवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

आरोप फेटाळले

गंगवार यांनी पदाचा गैरवापर करून अनुदान लाटल्याचे आरोप फेटाळले आहेत. सेवा नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचा दावा. आई व मुलगा हे 'आश्रित कुटुंबीय' नसून पत्नीच्या मालमत्तेची माहिती नियमानुसार जाहीर केल्याचे सांगितले.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

अभिजीत दीपके आक्रमक

दीपके यांनी गंगवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा मुद्दा काढत नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

cockroach janata party abhijeet dipke | Sarkarnama

गंगवारांसमोर आव्हान

परीक्षा सुधारणा आणि NEP अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियुक्तीनंतर हे आरोप पुन्हा चर्चेत आल्याने गंगवार यांच्यासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

IAS Naresh Pal Gangwar | Sarkarnama

NEXT : जंतरमंतरवरील मन हेलावणारे 'हे' फोटो एकदाच पाहाच! ना लाठ्या, ना दगड...

येथे क्लिक करा.