सरकारनामा ब्यूरो
अभिषेक सिंह यांनी 2011 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 94 व्या रँकसह आयएएस अधिकारी झाले.
अभिषेक यांनी 2013 मध्ये झाशी येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
आयएएस अधिकारी बनून देशसेवा करण्याचे स्वप्न होते, जे त्यांनी मेहनतीने पूर्ण केले.
अभिषेक यांनी टेलिव्हिजन अभिनेता म्हणूनही काम केले, शिवाय अनेक प्रसिद्ध वेब सीरिजमध्येही ते झळकले.
2022च्या गुजरात निवडणुकीदरम्यान सरकारी वाहनासमोर उभा असलेला फोटो त्यांनी पोस्ट केला होता.
पोस्ट केलेल्या फोटोवरून अनेक वाद पेटले आणि यावरून त्यांना निलंबित करण्यात आले, तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
माहिती न देता बराच काळ बेपत्ता झाल्यामुळेही राज्य सरकारने त्यांना बऱ्याचदा निलंबित केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत ते भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे.
अभिषेक सिंह यांनी आपल्या जिल्ह्यात यशस्वी उपक्रमांसोबत अनेक प्रकारची विकासकामेही पार पाडली आहेत.
R