सरकारनामा ब्यूरो
IAS अधिकाऱ्यांना कारवाईचे अनेक अधिकार मिळतात. परंतु काही वेळेला या अधिकाऱ्यांनाही विविध कारणामुळे सरकारच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशाच एका अधिकाऱ्यांना थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेले IAS एन प्रशांत हे 2007 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
एन प्रशांत यांनी सोशल मीडियावर एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्यावर टीका केली होती आणि याच कारणांमुळे 2024 ला त्यांना निलंबित करण्यात आले होते.
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथे राहणारे एन प्रशांत यांनी तिरुवनंतपुरम येथील लॉ कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2007 ला त्यांनी बँकिंगमध्ये कायद्याची पदवी प्राप्त केली.
अनेक वर्ष विविध पदांवर उल्लेखनीय काम केल्यानंतर 2015 मध्ये त्यांची नियुक्ती कोझिकोडचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली.
निलंबन झाले त्यावेळी ते कृषी विभागात विशेष सचिव होते. या पदावर असताना त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव ए जयथिलक यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली होती. ही टीकाच त्यांना भोवली.
कोझिकोडचे जिल्हाधिकारी असताना एन प्रशांत यांनी अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत. यामुळे त्यांना ‘कलेक्टर ब्रो’ अशी ओळख मिळाली होती.
प्रशांत यांनी कलेक्टर ब्रो: द क्विक्सोटिक ‘थॅलल्स’ ऑफ अ सिव्हिल सर्व्हंट, लाइफ बॉय – द लिटल बुक ऑफ हॅपीनेस (संतोषथिंते कोचुपुस्तकम), आणि ब्रोस्वामी स्टोरीज अशी पुस्तके लिहिली आहेत.