Akshay Sabale
राधेश्याम मोपलवार हे सर्वात भ्रष्ट आणि श्रीमंत अधिकारी असून त्यांच्याकडे 3 हजार कोटींची संपत्ती असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे मोपलवार चर्चेत आले आहेत. मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांची चर्चा पुन्हा रंगली आहे.
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
1995 साली स्टॅम्प कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टॅम्प आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी कोर्टात दिली होती.
समृद्धी महामार्ग पॅकेज क्रमांक 11 चे कंत्राट हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे 23 लाख शेअर्स मोपलवार कुटुंबियांकडे आहेत.
मोपलवार यांच्या कन्या तन्वीकडे हुजूर कंपनीचे 3 लाख 98 हजार शेअर्स, तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हजार शेअर्स आहेत.
समृद्धी महामार्ग प्रकरणासंबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात मोपलावर आणि मध्यस्त यांच्यात सेटलमेंट सुरू असल्याचं संभाषण होते.