सरकारनामा ब्यूरो
महिला दिवसानिमित्ती कतृत्वान आणि धाडसी असलेल्या आर.विमला यांनी महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या पदावर विशेष कामगिरी बजावली आहे तर, जाणून घेऊयात त्यांची कारकीर्द...
आर. विमला यांनी भुसावळ येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर बारावीत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला तर पुणे विद्यापीठातून बीएमध्ये अव्वल स्थान पटकावलं.
इतिहास या विषयात त्यांनी बीए, एमए आणि एम.फिल ची पदवी प्राप्त केली. तर याच विभागात त्यांनी व्याख्याता म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली.
1993 ला त्यांनी सार्वजनिक सेवेचा कार्यभार सांभाळत अनेक पदावर काम केले. लघु उद्योग विकास महामंडळ, फिल्म सिटीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्पग्रस्तांच्या मनोरंजन कर्तव्य आणि पुनर्वसनाच्या उपायुक्त पदावर काम केलं.
त्यांनी दादासाहेब फाळके फिल्मसिटीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्र सरकारचे उपसचिव म्हणून मनरेगा (EGS) ची अंमलबजावणी देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अनेक विभागातील कामाचा आर. विमला यांना 30 वर्षांहून जास्त अनुभव आहे. आणि महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून अधिक बचत गट करून महिलांना सक्षम बनवले.
'दीनदयाळ उपाध्याय' ग्रामीण कौशल्य योजनेद्वारे ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रदान करण्यासाठीची योजना राबवत 23000 हून अधिक तरुणांना नोकरी देण्याची जबाबदारीही त्या पार पाडत आहेत.
2025 ला त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार तसंच दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाचा पदभार स्वीकारला.