Rahul Kardile : महिन्याभरातच 3 वेळा बदली, IAS राहुल कर्डिलेंची कशी राहिली कारकीर्द?

Jagdish Patil

IAS बदली

राज्य सरकारकडून 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

राहुल कर्डिले

मात्र, बदली करण्यात आलेल्या IAS अधिकार्‍यांमध्ये राहुल कर्डिलेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण त्यांची एकाच महिन्यात 3 वेळा बदली करण्यात आली आहे.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

CIDCO

कर्डिले यांनी नुकताच CIDCOच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

जिल्हाधिकारी

त्यानंतर आता त्यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राहुल कर्डिले नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

शिक्षण

2015 बॅचचे IAS अधिकारी असलेले कर्डिले मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे आहेत. याच गावात त्यांनी प्राथमिक तर पार्थडीमधील करंजी गावात माध्यमिक शिक्षण घेतलं.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

इंजिनिअरिंग

त्यानंतर अहिल्यानगर येथील विखे महाविद्यालयात इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

अपयश

कर्डिलेंची MPSC तून उपनिबंधक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी UPSC च्या 3 मुलाखती दिल्या होत्या. पण त्यामध्ये अपयश आलं. मात्र, चौथ्या प्रयत्नात त्यांनी देशात 422 रँक मिळवली.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

MMRDA

कर्डिले यांची पहिली पोस्टिंग परभणीत होती. त्यानंतर त्यांनी अमरावतीत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर MMRDAच्या सहआयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

IAS Rahul Kardile | Sarkarnama

NEXT : अंगात भगव्या रंगाचा कुर्ता आणि हातात रुद्राक्षाची माळ, PM मोदींचे त्रिवेणी संगमात शाहीस्नान

PM Narendra Modi | Sarkarnama
क्लिक करा