Jagdish Patil
अमेरिकेच्या FDI ने माजी भारतीय RAW अधिकारी विकास यादवला वॉन्टेट लिस्टमध्ये टाकलं आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप विकासवर करण्यात आला आहे.
गुरपतवंत सिंग पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केलं आहे. मात्र , त्याच्याकडे सध्या अमेरिकेचं नागरिकत्व आहे.
या दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एफबीआयकडून विकासवर आरोप निश्चित करण्यात आलेत.
विकास यादवने कॅबिनेट सचिवालयात काम केले आहे. ज्यामध्ये RAW चा समावेश आहे.
अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी विकास यादवने कट रचल्याचा आरोप केला.
रे यांनी म्हटलं की, 'भारत सरकारचा कर्मचारी असलेल्या यादवने गुरपतवंत सिंगच्या हत्येचा कट अमेरिकेत रचला. यासाठी त्याने आपल्या अधिकाराचा आणि गुप्त माहितीचा वापर केला.'
विकासवर हत्येचा कट, मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचं FDI ने सांगितल्यानंतर त्याला सेवेतून काढून टाकल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे.