Ishita Singh : काय करते आप खासदार संजय सिंहांची मुलगी इशिता ? भारदस्त आवाजातील भाषण व्हायरल

Rashmi Mane

इशिता सिंह

दिल्ली अबकारी या कथित घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आम आदमी पार्टीचे (आप) फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह सध्या जेलमध्ये आहेत.

Ishita Singh | Sarkarnama

व्हिडिओ चांगलाच व्हायरल

खासदार संजय सिंह यांची मुलगी इशिता यांनी बुधवारी जाहीर सभेत वडिलांचे पत्र वाचून दाखवले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Ishita Singh | Sarkarnama

उत्तर प्रदेशात कार्यक्रमाचे आयोजन

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये बुधवारी आझाद सेवा समितीच्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Ishita Singh | Sarkarnama

वडिलांना लिहलेले पत्र

कार्यक्रमाला पोहोचलेल्या इशिता यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेले पत्र लोकांना वाचून दाखवले.

Ishita Singh | Sarkarnama

कार्यक्रम

या कार्यक्रमात संजय सिंह यांच्या पत्नी अनिता सिंह, दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांच्यासह अनेक आप नेते सहभागी झाले होते.

Ishita Singh | Sarkarnama

बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे

मुंबईत राहणाऱ्या इशिता यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ishita Singh | Sarkarnama

चित्रपटातही केलंय काम

इशिता यांनी प्रसिध्द दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' या प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

Ishita Singh | Sarkarnama

सोशल मीडियावर फॉलोअर्स

इशिता अनेक हिंदी-पंजाबी अल्बममध्येही दिसल्या आहेत. सोशल मीडियावर त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत.

Ishita Singh | Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय दोनदा UPSC क्रॅक; 21 व्या वर्षी IPS, नंतर IAS पदाला गवसणी

येथे क्लिक करा