Rashmi Mane
भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असले, तरी सध्याच्या खासदारांमधील निवृत्तीमुळे पक्षात सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे दर्शवत आहे.
गौतम गंभीर यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
जयंत सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत.
सध्या झारखंडमधील हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांना मोदी सरकारमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या.
जयंत सिन्हा यांच्या कुटुंबाचे भाजपशी जुने नाते आहे. त्यांचे वडील यशवंत सिन्हा हे देखील भाजपचे दिग्गज नेते राहिले आहेत.
यशवंत सिन्हा 1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री होते.
मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रातील वित्त आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.