Jagdish Patil
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
तर दुसरीकडे जरांगेंची मागणी मान्य झाल्यास ओबीसींचं आरक्षण संपेल, असा इशारा OBC आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
ज्या ज्या वेळी जरांगे उपोषणाला बसतील त्या त्या वेळी त्यांना अंगावर घेणारे लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत? ते जाणून घेऊया.
सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा, प्राध्यापक ते ओबीसी नेता असा हाकेंचा प्रवास आहे.
लक्ष्मण सोपान हाके असं त्यांचं पूर्ण नाव असून सोलापुरातील जुजारपूर गावात त्यांचा जन्म झाला. वडील मेंढपाळ असल्याने हाकेंनीही मेंढीपालन करत करत शिक्षण पूर्ण केलं.
सांगोला-सांगलीत शिक्षण घेतल्यानंतर पुढील ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते प्राध्यापक बनले.
नोकरी करतानाच त्यांनी धनगर आणि ओबीसी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ ओबीसींसाठी काम सुरू केलं.
सुरुवातीला यशवंत सेनेच्या माध्यमातून काम केल्यानंतर जे सोलापूर जिल्ह्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष बनले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रवक्तेपदी नियुक्ती.
हाकेंनी 2014 साली पहिल्यांदा सांगोला विधानसभा लढवण्याचं ठरवलं. मात्र ऐनवेळी त्यांनी शेकापला पाठिंबा दिला.
त्यानंतर 2019 ची निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2024 साली माढा मतदार संघातून लोकसभा लढवली यामध्ये त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं.