Roshan More
तमिळनाडूतील एम. शिवगुरु प्रभाकरन यांना IAS व्हायचे होते. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखिची होती. त्यांना शिक्षण घेतना प्रचंड अडचणी आल्या.
शिवगुरु प्रभाकरन यांचे वडील दारुच्या आहारी गेले होते. त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी प्रभाकरन यांच्या आई आणि बहिणीवर होती.
प्रभाकरण यांची आई टोपल्या विणत होत्या. त्या टोपल्या विकण्याचे काम प्रभाकरन यांनी केले.
शिक्षणाचा खर्च काढण्यासाठी प्रभाकरन यांनी शेतीत काम केले. शेती करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षणासाछी शिवगुरु प्रभाकरन यांनी मशीन ऑपरेटर म्हणून काम केले.
सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी प्रभाकरन यांनी वेल्लोरमधील काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. अभ्यास करत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
2017 मध्ये ऑल इंडिया 101 रँक मिळवत प्रभाकरन IAS अधिकारी झाले.