Vijaykumar Dudhale
मधुकर काशीनाथ पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर पिचड हे संस्थापक सदस्य आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदासंघातून 1980 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले
मधुकर पिचड हे 1980 ते 1995 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आहेत.
शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते 1999 ते 2009 दरम्यान आमदार हेाते.
मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. अकोल्यातून मधुकर पिचड हे सलग सहावेळा निवडून आले आहेत.
मधुकर पिचड हे 1991 मध्ये पहिल्यांदा आदिवासी विकास मंत्री झाले. त्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिडळात चार वेळा मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली
मधुकर पिचड यांनी विधान सभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले आहे. पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा मीडियात रंगली आहे. मात्र, वैभव पिचड यांनी आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे. आपण भाजपसोबत असल्याचे पिचड यांनी जाहीर केले आहे.