Rashmi Mane
देशातील 13 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक झाली.
त्यामध्ये मधुपर्णा ठाकूर वयाच्या 25 व्या वर्षी विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आहे.
बीजेपीच्या बिनय कुमार बिस्वास यांचा 33 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
मधुपर्णा ठाकूर यांना 1 लाख 77 हजारांहून अधिक मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बिनय कुमार यांना 74 हजारांहून अधिक मते मिळाली आहेत.
मधुपर्णा ठाकूर पश्चिम बंगाल विधानसभेत जिंकणाऱ्या सर्वात तरुण आमदार ठरल्या आहेत.
मधुपर्णा ठाकूर या तृणमूल नेत्या आणि राज्यसभा सदस्य ममता ठाकूर यांच्या कन्या आहेत.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी मधुपर्णा ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचला आहे.