Jagdish Patil
त्यांना 2023 साठी 'यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केलं.
राधिका यांनी काँगोमध्ये 30 सैनिकांच्या टीमचं नेतृत्व केलं होतं.
'युनायटेड नेशन्स पीस मिशनमध्ये लैंगिक समानता, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो.
मेजर सेन मार्च 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत काँगो येथे तैनात होत्या.
राधिका हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदर नगर शहराच्या रहिवासी आहेत
राधिका यांनी उच्च शिक्षण चंदीगडमधून पूर्ण केलं.
राधिका यांचा बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअर ते मेजर असा प्रवास.
राधिका सेन यांना 10 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्करात प्रमोशन मिळालं होतं.
भारतातील लष्करात असताना सेन जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि सिक्कीम येथे तैनात होत्या.