Mayur Ratnaparkhe
शिरूरमध्ये 'वंचित'ने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला होता.
मात्र, मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अन् त्यानंतर 'वंचित'कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे
शिरूर लोकसभेची बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द करण्यात आली आहे.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्याच्या मंगलदास बांदल यांनी विरोध केला होता.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
यापूर्वी बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तसेच त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी विधानसभेची निवडणूकदेखील लढविली होती.
शिरूर लोकसभेसाठी ते इच्छुक होते. यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेटदेखील घेतली होती.