Jagdish Patil
दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर आला असून भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता काबीज केली आहे.
'आप'चा मात्र निवडणुकीत पराभव झाला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया अशा दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपचा विजय झाला असला तरी या निवडणुकीत आपचे उमेदवार मोहम्मद इक्बाल हे सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.
इक्बाल यांनी मतिया महल मतदारसंघातून भाजपच्या दीप्ती इंदोरा यांचा तब्बल 42,724 मतांनी पराभव केला.
इक्बाल यांना एकूण 58,120 तर इंदोरा यांना 15,396 मते मिळाली, तर काँग्रेसच्या असीम अहमद खान यांना 10,295 मते मिळाली.
मोहम्मद इक्बाल यांच्यानंतर सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम आपचे उमेदवार चौधरी जुबैर अहमद यांनी केला आहे.
त्यांनी 79,009 मते मिळवत त्यांनी भाजपच्या अनिल कुमार शर्मा यांचा 42,477 मतांनी पराभव केला.
दिल्लीत 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 48 जागा तर आपने 22 जागा जिंकल्या. मात्र, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही.