Mohammad Mokhbar : कोण आहेत मोहम्मद मोखबर? रईसींच्या मृत्यूनंतर बनले आहेत इराणचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष!

Mayur Ratnaparkhe

इब्राहिम रईसी यांच्या अपाघाती निधनांतर उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोखबर यांना इराणचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष बनवलं गेलं आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनई यांनी त्यांच्या पदभार स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे.

ते आगामी 50 दिवसांपर्यंत या पदावर राहणार आहेत.

इब्राहिम रईसी यांनीच मोहम्मद मोखबर यांना उपराष्ट्राध्यक्ष केलं होतं.

इराणमधील शक्तिशाली नेत्यांपैकी मोखबर हे एक मानले जातात.

68 वर्षीय मोखबर हे रईसी यांचे अत्यंत निकटवर्तीय सुद्धा मानले जातात.

याशिवाय ते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला यांचेही निकटवर्तीय आहेत.

आतापर्यंत अयातुल्ला यांचे उत्तराधिकारी म्हणून रईसी यांच्याकडे पाहीलं जात होतं, परंतु आता मोखबर हे राष्ट्राध्यक्ष आहेत.

विशेष म्हणजे मोखबर यांच्यावर युरोपियन युनियने बॅन आणला आहे.

NEXT : लोकशाहीचा मतोत्सव