Chetan Zadpe
काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते. त्यांचा राजकारणाचा वारसा आता त्यांची मुलगी मुमताज पटेल चालवत आहेत.
गुजरातमध्ये इंडिया आघाडीत भरुच ही जागा 'आप'ला देऊ नये, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मुमताज पटेल भरुच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
अहमद पटेल यांची मुलगी मुमताज पटेल यांचा विवाह उद्योगपती इरफान सिद्दिकी यांच्यासोबत झाला आहे. अलीकडेच ईडीने इरफान सिद्दिकी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
हा वाद उफाळून आल्यावर आता भरुचच्या जागेवर काँग्रेस आणि आपच्या दरम्यान पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे.
7 जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांनी भरुच मतदारसंघासाठी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या विद्यमान आमदार चैत्रा वसावा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मुमताज पटेल या 'आप'च्या उमेदवाराला उघड विरोध करत आहेत. "वेळेआधी उमेदवार जाहीर करून 'आप'ने आघाडी धर्माचे पालन केले नाही, असे पटेल म्हणाल्या.
मुमताज पटेल यांना राहुल गांधी कॅम्पचे असेही मानले जाते. यामुळे आता काँग्रेसकडून त्यांची नाराजी कशी दूर केली जाते, हे पाहावे लागेल.
R