सरकारनामा ब्यूरो
सरकारी शाळेतून शिक्षण झालेले एन चंद्रशेखरन यांना दिवगंत रतन टाटांनी 21 फेब्रुवारी 2017 टाटा सन्सचे अध्यक्ष बनवले आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल.
एन. चंद्रशेखरन हे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे शिक्षण आणि जीवन खूप गरीब परिस्थितीत गेले. मात्र आज ते भारतातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कंपनीचे नेतृत्व सांभळत आहेत.
असे म्हटले जाते की, रतन टाटांनी अनेकांना बाजूला करत एन. चंद्रशेखरन यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
तमिळनाडूच्या मोहनूर गावातील रहिवासी असलेले एन चंद्रशेखरन यांनी त्यांचे शालेय शिक्षण याच गावातील एका सरकारी शाळेतून पूर्ण केले.
पुढे कोइम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून विज्ञानाची तर, तिरुचिरापल्लीतील इंजिनिअरिंग कॉलेजमधून संगणकमध्ये (MCA) पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये इंटर्न म्हणून 1987 मध्ये काम करत त्यांच्या करियरला सुरुवात केली.
20 वर्ष काम केल्यानंतर मेहनतीच्या बळावर 2007ला टाटामध्ये त्यांची नियुक्ती चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून करण्यात आली.
यानंतर अवघ्या 2 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 46 व्या वर्षी त्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे CEO म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांची एकूण संपत्ती 855 कोटी रुपये इतकी आहे.