Nana Kate : 'तुतारी' हाती घेण्याची चर्चा असलेले अजितदादांचे शिलेदार नाना काटे कोण?

Jagdish Patil

नाना काटे

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे.

Ajit Pawar NCP Leader Nana Kate | Sarkarnama

भाजप

मात्र, सध्या भाजपच्या अश्विनी जगताप चिंचवडमधून आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला गेल्यास पुढील निर्णय घेऊ, असं काटेंनी म्हटलं आहे.

Nana Kate Vs BJP | Sarkarnama

तुतारी

त्यामुळे ते 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे, असं झाल्यास हा अजितदादांसाठी मोठा धक्का असू शकतो.

Nana Kate will Joins NCP Sharad Pawar | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड अजितदादांचा बालेकिल्ला आहे. तर, नाना काटे हे चिंचवडमधील अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

Nana Kate Pimpri-Chinchwad | Sarkarnama

पराभव

काटेंना 2023 मधील पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्याविरोधात NCP कडून उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Nana Kate defeat in By Election | Sarkarnama

अजितदादा गट

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते अजितदादांसोबत राहिले. तर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताच चर्चेत आलेल्या नाना काटे यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊया.

Nana Kate NCP Ajit Pawar Group | Sarkarnama

विठ्ठल कृष्णाजी काटे

विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे हे राजकारणात गेल्या 20 वर्षांपासून सक्रिय आहेत. 2007 सालापासून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.

Vitthal Krishnaji Kate | Sarkarnama

वारकरी संप्रदाय

नाना काटे हे वारकरी संप्रदायाशी निगडित असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंचवड शहरात आहे. 2014 साली त्यांनी चिंचवड विधानसभा लढविली आहे.

Nana Kate Assembly Election | Sarkarnama

NEXT : विधिमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर; 2023-24 वर्षाचे मानकरी कोण?

Maharashtra Vidhan Parishad Awards | Sarkarnama
क्लिक करा