Akshay Sabale
15 ऑगस्ट 1954 रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द नायगावचे सरपंच म्हणून सुरू झाली.
गावगाडा चालवत असताना 1990 ते 2002 या काळात त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून भूमिका बजावली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काही काळ चव्हाण यांनी काम पाहिले.
2002 मध्ये वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले.
2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्यांदा त्यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.
2024 मध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करून वसंतराव चव्हाण लोकसभेला विजयी झाले आणि काँग्रेसनं नांदेडचा गड राखला.