Roshan More
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओत्ताक्कारतेवर पन्नीरसेल्वम यांनी आज एम के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षात प्रवेश केला.
पन्नीरसेल्वम हे एआयडीएमके पक्षाचे माजी मुख्यमंत्री आहेत. मागील तीन वर्षांपासून ते पक्षातून निलंबीत होते.
त्यांनी विधासभा निवडणुकीच्याआधी आज मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थितीमध्ये डीएमकेमध्ये प्रवेश केला आहे.
पन्नीरसेल्वेम हे थेवर समाजातून येतात. त्या समाजातून त्यांना मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हा समुदाय डीएमकेसोबत जाण्याची शक्यता आहे.
पन्नीरसेल्वम हे जयललिता यांचे विश्वासू नेते मानले जात होते. जयललित यांच्या निधनानंतर पक्षात पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्यात संघर्ष झाला.
जयललिता यांना दोन वेळा मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. 2001-02 मध्ये त्या अपात्र ठरल्या त्यावेळी आणि 2014-15 मध्ये त्यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर. मात्र, या दोनही वेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम यांना पसंती दिली.
जयललिता यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
2022 मध्ये पक्षात माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे वर्चस्व निर्माण झाले. पक्षातील दोन गटात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू होता. त्यातूनच पनीरसेल्वम यांचे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले.