सरकारनामा ब्यूरो
PM नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (ता.17) 'मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो'च्या उद्घाटनादरम्यान ओसामु सुझुकी आणि रतन टाटा यांच्या नावाचा उल्लेख केला.
रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला माहीत आहे पण मोदींनी उल्लेख केलेले दुसरे नाव म्हणजे ओसामु सुझुकी कोण आहेत?
सुझुकी हे एक जपानी व्यावसायिक आहेत. गेरोचे मूळ रहिवासी असलेले ओसामु यांनी चुओ या विद्यापीठातून पदवी घेतली.
ओसामू यांनी स्थानिक बँकेत कर्ज अधिकारी म्हणून काम केले. 1950 ला त्यांनी उत्तरार्धात सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या मिचिओ सुझुकी यांची नात शोको सुझुकीशी लग्न केलं. या कुटुंबाला वारसा नसल्याने ओसामुंना दत्तक मुलगा मानला गेले.
1958 मध्ये त्यांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमध्ये काम केले. यानंतर 1963 ला संचालकपद, 1967 ला कनिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तर वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा कार्यभार सांभाळला.
सुझुकी मोटर ही फक्त जपानमध्येचं नाही तर, 60च्या काळात सुझुकीने बाहेरील देशातील वाहन बाजारपेठेतही आपले अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.
थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान आणि 1980 ला भारतात सर्वात मोठी गुंतवणूक करत सुझुकी मोटर्स आकर्षणाचे केंद्र बनले.
सुझुकीने मारुती उद्योग लिमिटेड लाँच करण्यासाठी भारत सरकारसोबत भागीदारी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओसामू हे त्यावेळी वर्षाला सुमारे 200,000 युनिट्सचे उत्पादन करत होते.
21 व्या शतकात सुरूवातीला, 31 देशांमध्ये तिचे 60 प्लांट होते आणि 190 देशांमध्ये सुझुकीची विक्री होती.
2003 विक्रीची ओसामु यांच्या नेतृत्वाखाली सुझुकी मोटरची विक्री US$ 16.8157 बिलियनपर्यंत पोहोचली.
ओसामु सुझुकी यांच वयाच्या 94 वर्षी निधन झाले.