Mayur Ratnaparkhe
तुर्कमेनिस्तानमधील अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचे राजदूत के.के. अहसान वगान यांना अमेरिकेत प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
इमिग्रेशनच्या आक्षेपामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी वगान यांना विमानतळावरूनच परत पाठवले.
राजदूत के.के अहसान वगान यांच्याजवळ वैध अमेरिकेचा व्हिजा आणि सर्व आवश्यक कागदपत्र नव्हते.
ते लॉस एंजेलिसच्या दौऱ्यावर गेले होते, हा त्यांचा वैयक्तिक दौरा होता.
केके वगान यांनी अनेक देशांमध्ये सेवा दिली आहे. त्यांनी तुर्कमेनिस्तानमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून बराच काळ काम केले आहे.
याशिवाय, त्यांनी काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासात द्वितीय सचिव म्हणूनही काम केले आहे.
लॉस एंजेलिसमधील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासात उपवाणिज्य दूत म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळेलली आहे.
मस्कतमधील राजदूत तसेच नायजरमधील पाकिस्तानी दूतावासातही काम केले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने या प्रकरणावर आश्चर्य आणि असंतोष व्यक्त केला.