Rashmi Mane
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये कार्यक्रमापूर्वी शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली.
2016 पासून प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आहेत. सुरुवातीचे 5 वर्षे अध्यक्ष ही होते.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गायकवाडांना 2019 च्या लोकसभा तिकिटाची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने तिकिट नाकारले. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. कार्यरत असताना देखील त्यांनी संभाजी ब्रिगेडचं काम चालूचं ठेवले.
प्रवीण गायकवाड हे 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' या अभियानाचे संस्थापक आहेत. त्यांनी शेकडो तरुणांना परदेशात संधी मिळवून दिल्या आहेत.
अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा" ही प्रवीण गायकवाड यांची महत्वाकांक्षी अभियान आहे.
या अभियाना अंतर्गत 52 देशांत शेकडो तरुणांना नोकरी मिळाली आहे. ही नोकरी
आरक्षणाच्या आधारे जागतिक स्तरावर बहुजनांना उभारी देणारी ठरली.
गायकवाड यांनी त्यांच्या अभियानातून फक्त नोकरी नाही तर उद्योजक घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच त्यांनी तरुणांना स्वतःचा ब्रँड उभारण्याची प्रेरणा देखील दिली आहे.