Raja Bhaiyya : अमित शाहांसोबत बंद खोलीत चर्चा करणारे राजा भैय्या आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

उत्तर प्रदेशातील कुंडा विधानसभा मतदारसंघाचे रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या हे आमदार आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकी राजा भैय्या यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राजा भैय्या यांची बंद दाराआड चर्चाही झाली आहे.

मात्र तरीही राजा भैय्या यांनी भाजपाला किंवा समाजवादी पार्टीला कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.

अमित शाहांबरोबर नेमकी काय चर्चा झाली याबाबत मात्र राजा भैय्या यांनी काहीही माहिती दिलेली नाही.

बंद दाराआड झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, असं त्यांनी सांगितलं आहे.

मात्र अमित शाहांबरोबर झालेली चर्चा अविस्मरणीय होती असेही त्यांनी आवर्जून म्हटले आहे.

मागील काळात राजा भैय्या आणि अखिलेश यादव यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र आता संबंध सुरळीत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Next : निवडणुकीनंतर उमेदवार देवदर्शन, सहल मतदारसंघातील कामात व्यस्त