Mayur Ratnaparkhe
माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची मंगळवारी नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
झारखंड केडरचे १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत गौबा.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राजीव गौबा यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
गौबा यांनी ऑगस्ट २०१९ पासून ऑगस्ट २०२४ मध्ये निवृत्त होईपर्यंत कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले.
राजीव गाबा यांचा यांचा कार्यकाळ दोनदा वाढविण्यात आला.
कोविड-१९ दरम्यान आणि आर्थिक पुनर्प्राप्ती धोरणांसह प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नीती आयोगात त्यांची नियुक्ती ही दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणे घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
राजीव गाबा यांनी इतर जबाबदाऱ्यांसह, केंद्रीय नगरविकास मंत्रालयात सचिव, गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी विभागाचे निरीक्षण केले आहे.