Rashmi Mane
छत्तीसगडमधील निलंबित आयएएस अधिकारी रानू साहू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या 2010 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
ईडीने रानू यांच्या विरोधात कोळसा घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या तुरुंगात आहेत.
रानू साहू एक वर्षापासून तुरुंगात आहेत, त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
रानू यांचा जन्म छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात झाला. ती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या.
त्या कॉलेज आणि शाळेत असल्यापासून टॉपर राहिल्या आहेत. लहानपणापासून पोलिस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते.
2005 मध्ये रानू यांची डीएसपी पदासाठी निवड झाली होती. नोकरीत रुजू झाल्यानंतर त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि 2010 मध्ये UPSC पास केली.
त्यांची पहिली पोस्टिंग कांकेर जिल्हाधिकारी म्हणून झाली. नंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांचा कार्यभार सांभाळला आणि नंतर मंत्रालयात पोस्टिंग मिळाली.
काँग्रेस सरकारच्या प्रभावशाली अधिकाऱ्यांमध्ये रानू यांची गणना केली जाते. कृषी विभागातही त्यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.