Vijaykumar Dudhale
लोकसभा निवडणुकीत रश्मी बर्वे यांना रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे तिकिट जाहीर झाले होते.
पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांचा रामटेकमधील उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला होता.
गोडेगाव टेकाडी (ता. पारशिवनी) येथील वैशाली देवीया यांनी रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरुद्ध जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने देवीया यांनी केलेल्या तक्रारीनुसार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र 28 मार्च 2024 रद्द केले होते. विशेष म्हणजे त्या आदेशानुसार बर्वे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही 02 एप्रिल 2024 रोजी विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते.
लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कायम राहावा, यासाठी रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
रामटेक लोकसभा मतदासंघाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली हेाती. ते रामटेकमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
रश्मी बर्वे यांनी त्याचवेळी उच्च न्यायालयातही जात पडताळी समितीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली हेाती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनवाणी पूर्ण करत 9 मे 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.
उच्च न्यायालयाने जात वैधता पडताळणी समितीला एक लाखाचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना जिल्हा परिषद सदस्यत्व पुन्हा बहाल करावे लागणार आहे.