Mangesh Mahale
दिल्ली दौऱ्यात मोदी भाजपचे उमेदवार रविंद्र नेगी यांच्या तीन वेळा पाया पडले
त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नेटकरऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या.
प्रथम नेगी हे मोदींच्या पाया पडले. त्यानंतर मोदी तीन वेळा खाली वाकून नेगी यांच्या पाया पडले.
नेगी हे मुळ उत्तराखंड येथील आहेत. विनोद नगर वार्ड -198 मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही रविंद्र नेगी यांचे चांगले वजन आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध त्यांनी लढत दिली होती.
भाजपने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात आपचे अवध ओझा रिंगणात आहेत.