Deepak Kulkarni
दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहे. त्यातच मुंबईतही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. अशावेळी पोलिसांच्या गाडीसमोर निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबईत या तरुणीनं बुधवारी(ता.22) छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आली. कोहिनूर स्क्वेअर येथे तिनं चक्क पोलिसांची व्हॅन थांबवली.
मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवणारी तरुणीचं नाव रिया अहिर आहे. ती मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा चेहरा बनलीय.
रिया अहीर ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कार्यरत आहे.
हुडी आणि कॅप घातलेल्या रियानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट पोलिसांची व्हॅन आपल्या एका हाताने रोखली. तिचे व्हिडीओ,फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
रिया ही अंधेरी पूर्वे येथे MIDC परिसरात वास्तव्याला आहे. तिचं सध्या शिक्षण सुरू असून ती एक कलाकार, अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजक म्हणून पुढे येत आहे. आत्तापर्यंत ती अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे.
तिचा 'रियासत' नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असल्याचीही माहिती आहे. या ब्रँडच्या माध्यमातून ती स्वतः कपडे डिझाइन आणि हँडक्राफ्ट करते. रियाचे इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तिनं मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवताना भीती वाटली नाही का? या प्रश्नावर रियांनं मोजकं पण थेट भाष्य केलं. पोलीस व्हॅन थांबवली,तेव्हा मनात भीती नव्हती. पण ती व्हॅन माझ्या अंगावरून जरी गेली असती, तरी मला कोणतंही दु:ख झालं नसतं, असं तिनं बेधडकपणे सांगितलं.