S Keerthana : विजयच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री, वयाच्या 29 व्या वर्षी मंत्रिपद मिळालेल्या एस किर्तना कोण ?

Roshan More

तमिळनाडूनत 'विजय'राज

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे.

मंत्र्यांची शपथ

विजय यांच्यासोबत तब्बल 9 जणांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यातील एक किर्तना या एकमेव महिला मंत्री आहे.

एस किर्तना

वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी एस किर्तना यांना विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.

सहा भाषांवर प्रभुत्व

एस किर्तना यांना तब्बल सहा भाषा येतात. तमिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

पॉलिटिकल स्ट्रेटेजिस्ट

एस किर्तना या पॉलिटिकल स्ट्रेटेजिस्ट आहेत. तमिळनाडूमध्ये त्यांनी डीएमके आणि एडिएमके पक्षासोबत काम केले आहे. तर, आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत काम केले आहे.

सरकारी शाळेत शिक्षण

किर्तना सांगतात की, त्यांचे शिक्षण हे तमिळ माध्यमातून सरकारी शाळेतून झाले आहे. त्यांना विविध भाषा शिकण्याची आवड आहे.

शिवकाशीमधून विजय

टीव्हीके पक्षातून त्यांनी शिवकाशी मतदारसंघातून निवडणूक लढवली. काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी 11 हजार 670 मतांनी पराभव केला.

NEXT : राहुल गांधींसोबत सेल्फी, त्रिशा कृष्णनची उपस्थिती अन् आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याचे PHOTOS

Joseph Vijay Oath Ceremony | Sarkarnama
येथे क्लिक करा