Jagdish Patil
अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सचिन वाझे यांनी देशमुखांवर खळबळजनक आरोप केले.
अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप वाझे यांनी केला आहे.
वाझेंच्या आरोपामुळे उद्धव ठाकरेंचे सरकारच्या काळातील 100 कोटींची खंडणी, अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
वाझेंने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचंही नाव घेतलं आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलिस निरीक्षक, म्हणजेच API पदावर कार्यरत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत होते.
जून 2020 मध्ये मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाझेंच निलंबन मागे घेतलं. त्यामुळे 16 वर्षांनी ते पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आले.
"फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचंही नाव लिहलंय, देशमुखांना पीए मार्फत पैसे दिले जायचे, माझी नार्को करा," असा गौप्यस्फोट वाझेंनी केला आहे.