Sadhna Singh BJP Leader : 'भाजप'कडून राज्यसभेचं तिकीट मिळालेल्या कोण आहेत साधना सिंह?

Rashmi Mane

राज्यसभा निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने 14 राज्यसभा खासदार उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात साधना सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे.

भाजपच्या आमदार

साधना सिंह या पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असून त्या मुघलसराय विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत.

राजकीय कारकिर्द

त्यांनी 1992 मध्ये भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

भाजप महिला मोर्चा अध्यक्ष

साधना यांनी पक्षात अनेक पदांवर काम केले, त्या दोनदा भाजप महिला मोर्चा चंदौलीच्या अध्यक्ष होत्या.

वर्किंग कमिटीच्या सदस्य

त्या तीन वेळा भाजप यूपी वर्किंग कमिटीच्या सदस्याही होत्या.

उद्योग व्यापार मंडळ

त्या जिल्हा उद्योग व्यापार मंडळ चंदौली उत्तर प्रदेशच्या अध्यक्षाही होत्या.

विधानसभा निवडणुक

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना मुगलसराय विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

प्रतिस्पर्धी जोरदार पराभव

या निवडणुकीत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे बाबुलाल यादव यांचा 13,243 मतांनी पराभव केला.

Next : पुन्हा 'दिल्ली चलो' मोर्चा... काय आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

येथे क्लिक करा