Samarjeetsinh Ghatge : तुतारी हाती घेणारे समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

Vijaykumar Dudhale

शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे (घाटगे) वंशज अशी समरजितसिंह घाटगे यांची ओळख आहे

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

जयसिंगराव घाटगे हे आजोबा

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थानचे अधिपती होते. त्यांचे सुपुत्र तथा कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे समरजितसिंह घाटगे यांचे आजोबा होते.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

सीएचे शिक्षण

कागलच्या घाटगे घराण्यात 19 जानेवारी 1983 रोजी समरजितसिंह यांचा जन्म झाला. त्यांनी पुण्यातून चार्टर्ड अकाउंटंटचे (सीए) शिक्षण पूर्ण केले आहे.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

छत्रपती शाहू कारखाना निवडणुकीत विजय

विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या निधनानंतर झालेल्या श्री छत्रपती शाहू कारखान्याच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. तेव्हापासून ते राजकारणात सक्रीय झाले.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

शाहू कारखान्याचे अध्यक्ष

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजितसिंह घाटगे हे 2015 मध्ये प्रथमच अध्यक्ष झाले.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

म्हाडाचे अध्यक्ष

समरजितसिंह घाटगे यांनी म्हाडाचे (पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ) पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

भाजपचे जिल्हाध्यक्ष

समरजितसिंह घाटगे हे अगदी परवापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

राष्ट्रवादीत 3 सप्टेंबरला प्रवेश

येत्या 3 सप्टेंबर रोजी समरजितसिंह घाटगे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत

Samarjeetsinh Ghatge | Sarkarnama

धक्कादायक! देशात तासाला 3 महिलांवर लैंगिक अत्याचार, सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात?

Rape Cases in India | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा