सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेश पोलिस अधिकारी अनुज चौधरी यांच्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समर्थन केले आहे. तर जाणून घेऊयात याविषयी...
अनुज चौधरी हे संभलचे पोलिस उपविभागीय अधिकारी आहेत. पोलिसांत येण्यापूर्वी ते पहिलवान होते.
अनुज यांनी क्रिडा कोट्यातून पोलिस भरतीची परीक्षा देत 'उपअधिक्षक'(डीएसपी) हे पद मिळवले.
सीओ अनुज चौधरी यांना 2005 मध्ये कुस्तीसाठी भारतातील प्रतिष्ठित 'अर्जुन पुरस्कार' मिळाला आहे.
1997 ते 2014 या कालावधीत ते कुस्तीचे राष्ट्रीय 'चॅम्पियन' होते. चॅम्पियन अनुज यांनी दोन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (2002, 2010) रौप्य आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके पटकावली आहेत.
रामपूर येथे पहिली नियुक्ती झाल्यानंतर सपा नेते आझम खान यांच्याशी झालेल्या वादानंतर ते खूप चर्चेत आले होते.
शुक्रवारचे नमाज हे वर्षातून 52 वेळा येतात, परंतु होळी हा सण वर्षातून एकदाच येतो. जर मुस्लिम लोकांना असं वाटत असेल की, होळीच्या रंगांमुळे त्यांचा धर्म अपवित्र होईल तर त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडू नये, असं ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री योगींनी या विधानाचे समर्थन करत म्हटले आहे की, आमचे पोलिस अधिकारी एक पहिलवान होते, आणि ते एका पहिलवानासारखे बोलत असतील तर काही लोकांना त्यांचे वाईट वाटेल. पण ते खरे आहे आणि ते लोकांनी स्वीकारले पाहिजे.