सरकारनामा ब्यूरो
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यासमोर तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षीत यांचे चिंरजीव संदीप दीक्षीत हे नवी दिल्ली या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
संदीप दीक्षीत यांचा जन्म 15 ऑगस्ट 1964 ला उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे झाला.
दीक्षीत यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास या विषयात डिग्री मिळवली. इन्स्टिस्टूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) येथून 1989 मध्ये ग्रामीण व्यवस्थापनात पदवी घेतली.
संदीप यांनी राजकारणात येण्यापूर्वी संकेत माहिती आणि संशोधन संस्था प्रा. लिमिटेडमध्ये 1996 ला जगातील पहिला उप-राष्ट्रीय मानव विकास अहवाल तयार केला.
संदीप हे ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत.
काँग्रेस या राजकीय पक्षाचे ते सदस्य आहेत.
संदीप हे पूर्व दिल्ली मतदारसंघाचे 2004 ते 2014 या कालावधीत खासदार होते.
भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना जून 2019 मध्ये यांच्या वर्तनाची तुलना "रस्त्यावरच्या गुंड" अशी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.