सरकारनामा ब्यूरो
लवकरच निवृत्त होत असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती खन्ना यांच्या नांवाची शिफारस केली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पुढील महिन्यात निवृत्त होत असून पुढील सरन्यायाधीश पदासाठी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
संजीव खन्ना हे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून ओळखले जातात
केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या आग्रहानुसार त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली, खन्ना यांचा कार्यकाळ हा केवळ सहा महिन्याचा असून, 13 मे 2025 रोजी ते सेवानिवृत्त होतील.
दिल्ली विद्यापीठातून विधीची पदवी प्राप्त करुन त्यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये एक वकील म्हणून त्यांनी नोंदणी केली. सुरूवातीला दिल्लीतील जिल्हा कोर्टात आणि नंतर दिल्ली हायकोर्टात त्यांनी वकिली केली.
सुप्रीम कोर्ट विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत काम केले. त्यांचे वडील देवराज खन्ना आणि चुलते हसराज खन्ना हे देखील सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होते.
इलेक्ट्रोल बॉन्ड असंविधानिक घोषित करणाऱ्या खंडपीठात खन्नांचा मोठा वाटा होता. तसेच कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या पाच सदस्यांच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती खन्ना यांचा सहभाग होता.