Satyapal Malik Profile : मोदींवर टीकेचे बाण अन् घरावर सीबीआयची रेड; कोण आहेत सत्यपाल मलिक?

Rashmi Mane

सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापा

CBI ने आज (22 फेब्रुवारी) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापे टाकले. त्यासोबतच 30 हून अधिक जागांवर छापे टाकण्यात आले.

Satyapal Malik | Sarkarnama

पॉवर प्रोजेक्ट प्रकरणात छापेमारी

2019 मध्ये जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये झालेल्या 2,200 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

Satyapal Malik | Sarkarnama

सत्यपाल मलिक यांच्यावर कारवाई

जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Satyapal Malik | Sarkarnama

मोदींवर टीका करणारे

उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहणारे सत्यपाल मलिक गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे सत्यपाल मलिक.

Satyapal Malik | Sarkarnama

राजकीय प्रवास

77 वर्षीय सत्यपाल मलिक एकदा आमदार आणि एकदा खासदार राहिले आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी, मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता.

Satyapal Malik | Sarkarnama

राज्यपाल पद भूषवले आहे

ते बिहार, ओडिशा, गोवा आणि मेघालयचे राज्यपालही राहिले आहेत. जाट कुटुंबातून आलेले सत्यपाल मलिक हे देशाच्या राजकारणातील जवळपास प्रत्येक विचारधारेत सहभागी आहेत.

Satyapal Malik | Sarkarnama

उत्तर प्रदेश...

जाट शेतकरी कुटुंबातील सत्यपाल यांचा जन्म पश्चिम उत्तर प्रदेशात झाला.

Satyapal Malik | Sarkarnama

राजकारणाची सुरुवात

लोहिया यांच्या समाजवादाने प्रभावित होऊन विद्यार्थी नेता म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला.

R

Satyapal Malik | Sarkarnama

Next : जे. पी. नड्डांच्या मुंबई दौऱ्यावर; पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा