Mangesh Mahale
तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात मोठा भूकंप आला आहे. पक्षाविरुद्ध 20 खासदारांनी बंडखोरी केली आहे. यात सायनी घोष या एक खासदार आहेत.
एकेकाळी ममता बॅनर्जींच्या निकटवर्ती असलेल्या सयानी घोष यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारल्याने त्या सध्या चर्चेत आहेत.
17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 2010 मध्ये 'इच्छे दाना' या टेलिफिल्मद्वारे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण, 'नोटोबोर नोटआउट' हा पहिला चित्रपट
2013 आणि 2014 मध्ये, सायनी यांनी जलशा मूव्हीजसाठी कलकत्ता फुटबॉल लीगच्या थेट प्रक्षेपणाचे सह-सूत्रसंचालन केलं होतं.
सयानी घोष यांनी 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सहभाग होऊन राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
टीएमसीने त्यांना आसनसोल मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण त्यांचा भाजपच्या उमेदवार अग्निमित्र पॉल यांनी पराभव केला.
2024 मध्ये त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर जादवपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यात आणि खासदार झाल्यात. टीएमसीचा एक सशक्त तरुण चेहरा अशी त्यांची ओळख होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सायनी यांची एकूण मालमत्ता ₹91.89 लाख आहे. त्यांच्यावर ₹5.9 दशलक्ष कर्ज आहे.