Shama Mohamed : रोहित शर्माला फिटनेसवरून नाव ठेवणाऱ्या शमा मोहम्मद आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

काँग्रेसच्या प्रवक्त्या

शमा मोहम्मद या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत.

रोहित शर्मच्या फिटनेसवर टिप्पणी -

शमा मोहम्मद यानी एक्सवर एक पोस्ट करत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर टिप्पणी केली.

रोहित शर्मा जाड आहे -

शमा मोहम्मद यांनी आपल्या पोस्टमध्ये रोहित शर्मा हा जाड असल्याचं म्हटलं आहे.

निराशाजनक कॅप्टन -

एवढंच नाहीतर रोहित शर्मा हा आतापर्यंतचा निराशाजनक कॅप्टन असल्याचंही शमा मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

वक्तव्यामुळे टीका -

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा बद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली

काँग्रेसने दिली तंबी -

वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची खराब होत असलेली प्रतिमा बघता काँग्रेसने त्यांना तंबी दिली व पोस्ट हटवण्यास सांगितले.

अखेर त्यांनी ती पोस्ट हटवली -

पक्षाकडून कानउघडणी झाल्यावर शमा मोहम्मद यांनी अखेर रोहित शर्माबाबतची पोस्ट डिलीट केली.

भाजप आक्रमक -

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबाबत केलेल्या विधनावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला धारेवर धरलं.

वजन कमी करण्याचा सल्ला

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला वजन कमी करण्याचा सल्लाही दिला होता.

काँग्रेसनेही हात झटकले -

शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नसल्याचं प्रवक्ते पवन खेडा यांनी स्पष्ट केलं आहे.

भूमिका स्पष्ट केली -

मी खेळाडूच्या फिटनेसवर बोलले होते. त्यामध्ये शारीरिक व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता. खेळाडूने फिट असायला हवं, असं मला वाटतं. असंही शमा मोहम्मद म्हणाल्या आहेत.

Next : मायावती यांनी एका झटक्यात भाचा आकाशची केली हकालपट्टी, पण का?

Akash Anand | Sarkarnama
येथे पाहा