Shishupal Patle : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिशुपाल पटले कोण आहेत?

Vijaykumar Dudhale

पोवार समाजाचे नेते

शिशुपाल पटले हे भंडारा जिल्ह्यातील पोवार समाजाचे मातब्बर नेते मानले जातात.

Shishupal Patle | Sarkarnama

भंडारा, गोंदियात मोठा चाहता वर्ग

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात शिशुपाल पटले यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

Shishupal Patle | Sarkarnama

झेडपी अध्यक्ष

शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे.

Shishupal Patle | Sarkarnama

प्रफुल्ल पटेल यांचा पराभव

शिशुपाल पटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बड नेते प्रफुल्ल पटेल यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे.

Shishupal Patle | Sarkarnama

भाजपचे खासदार

भंडारा लोकसभा मतदारसंघातून 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर शिशुपाल पटले खासदार म्हणून निवडून आले होते

Shishupal Patle | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

शिशुपाल पटले यांनी आज (ता. 16 ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Shishupal Patle | Sarkarnama

भाजप हा ठेकेदाराचा पक्ष

आता पूर्वीचा भाजप राहिलेला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही, असा आरोप शिशुपाल पटले यांनी केला

Shishupal Patle | Sarkarnama

सत्तेचा हव्यास

ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडलेला नाही, असे शिशुपाल पटले यांनी काँग्रेस पक्षावेळी म्हटले आहे.

Shishupal Patle | Sarkarnama

वंचितचं चिन्हं ठरलं, 'गॅस सिलिंडर' घेऊन वाटचाल

Vanchit Bahujan Aaghadi | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा