Jagdish Patil
'लेडी जेम्स बाँड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शरद पवार गटातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटात न जाता त्यांनी थेट काँग्रेसचा हात हातात धरला आहे.
पवारांची साथ सोडून आपण हरियाणा काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
हरियाणात आता विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशातच दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पवार गटात नाराज असलेल्या दुहान यांनी थेट सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. मात्र, शरद पवारांवर निष्ठा कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सोनिया दुहान यांनी राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्या पक्षाचं नेतृत्व करत होत्या.
सोनिया दुहान या हरियाणामधील हिसारच्या रहिवासी असून 3 भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून त्यांनी BSC केलं आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी NCP मध्ये प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात 2 निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं. त्या राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या.